Monday, September 29, 2014
Saturday, June 14, 2014
Tuesday, April 29, 2014
1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन...... महाराष्ट्र ज्या नावतच या राष्ट्राची, राज्याची महानता दिसून येते... हा महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबांची ओवी पासून बनलेला तुकोबांच्या अभंगमधे तल्लीन होणारा संत नामदेव, एकनाथ, चोखामेळा, यांची संत भुमी आसलेला साई बाबा.. शेगाव चे गजानन महाराज अथवा स्वामी समर्थ या दैवी माणसांची देवभूमी आसलेला महाराष्ट्र संत गाडगे बाबा ते महात्मा ज्योतिबा फुले या सारख्या समाज सुधाराकाचा महाराष्ट्रा बाबा आमटे, विनोबा भावे , सारख्यनी आपले अखे जीवन ज्याला वाहीले आसा महाराष्ट्रा या महाराष्ट्रणेच आम्हाला स्वाभिमान शिकवला ..ज्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कड्या कपर्यातून एक स्वातंत्र्याचा किरण जिजाऊ च्या पोटी जन्माला आला .. या मातितच छ्त्रपतींचा जन्म झाला ..आसा महाराष्ट्र.. ज्याने आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवले .. .त्या शिवबाचा महाराष्ट्र धर्मवीर संभाजीच्या पराक्रमाणे दिल्ली ला ही घाम फुटायला भाग पडणारा माझा महाराष्ट्र कोटी कोटी दलितांचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी .. कर्मभूमी असलेला महाराष्ट्रा .. फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्रा .. शिवबाच्या शक्तिचा महाराष्ट्र .. संत परंपरेच्या भक्तीचा आसा माझा महाराष्ट्रा ...... माझा महाराष्ट्र ..... महाराष्ट्र दिन.. या दिवशी त्या 106 हुतात्म्याना विसरून कसे चालेल .. ज्यानी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा महारष्ट्रा एक संध ठेवला .. त्या सर्वाना .. आणि या महाराष्ट्रा साठी लढलेल्या .. मराठी संस्कृती च्या उत्कर्षा साठी झीजलेल्या त्या प्रत्येक महा मानवास विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वाना या महाराष्ट्रा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. - संदीप आटकेकर
Subscribe to:
Comments (Atom)


















